मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 2 जानेवारी 2021 (09:07 IST)

घरात हनुमानाचे चित्र कुठे लावावे, जाणून घ्या

प्रभू श्रीराम भक्त हनुमान साक्षात जागृत देव आहे. हनुमानाची भक्ती करणं जेवढी सोपी आहे तेवढीच अवघड देखील आहे. अवघड या साठी कारण यासाठी व्यक्तीला पावित्र्य असणे आणि उत्तम चारित्र्याचे असणे आवश्यक आहे, अन्यथा त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. 
 
हनुमानाची भक्ती केल्याने चमत्कारिक रूपाने सर्व संकटे दूर होऊन भाविकाला शांती आणि आनंद मिळतो. ज्ञानी असे म्हणतात की ज्याने एकदा हनुमानाच्या भक्तीचा आस्वाद घेतला तो आयुष्यात कधीही पराभूत होत नाही. तो आयुष्यात हरतं असताना जिंकतो. अशा भाविकांचा कोणीही शत्रू नसतो. 
 
ज्या घरात हनुमानाचे चित्र असते त्या घरात मंगळ, शनी, पितृ आणि भुताचे दोष नसतात. हनुमानाचे भक्त आहे तर हनुमानाचे चित्र घरात कुठे आणि कशा प्रकारे लावावे हे जाणून घेणे आवश्यक आहे. चला तर आम्ही आज सांगत आहो की हनुमानाचे चित्र लावायचे काही नियम आहे.
 
* दक्षिणेकडे तोंड असलेले चित्र लावावे -
वास्तुनुसार हनुमानाचे चित्र नेहमी दक्षिणे कडे तोंड असलेले असावे. कारण हनुमानाने आपले सर्वात जास्त प्रभाव या दिशेला दाखवले आहे. हनुमानाचे चित्र या दिशेला लावल्याने दक्षिणेकडून येणारी प्रत्येक वाईट शक्ती हनुमानाला बघून परत जाते. या मुळे घरात सौख्य आणि समृद्धी नांदते.
 
* शयनकक्षात हनुमानाचे चित्र लावू नये -
शास्त्रानुसार हनुमान हे ब्रम्हचारी आहे आणि या कारणास्तव त्यांचे चित्र शयनकक्षात न लावता घरातील देऊळात किंवा इतर कोणत्याही पावित्र्य जागी ठेवावे हे शुभ आहे. शयनकक्षात लावणे अशुभ आहे.
 
* हनुमानाचे शक्ती प्रदर्शन करतानाचे चित्र लावावे -
भूतबाधा पासून वाचण्यासाठी आणि जर आपल्याला असे वाटत आहे की घरात नकारात्मक शक्तींचा वास झाला आहे तर घरात हनुमानाचे शक्ती प्रदर्शन करीत असल्याचे चित्र लावावे. घरात पंचमुखी हनुमानाचे चित्र देखील प्रवेशदारावर किंवा अशा ठिकाणी लावू शकता जिथून ते सर्वांना दिसेल. असे केल्याने घरात कोणतीही वाईट शक्ती घरात शिरकाव करणार नाही.
 
* पंचमुखी हनुमान -
वास्तु विज्ञानानुसार पंचमुखी हनुमानाची मूर्ती ज्या घरात असते तेथे प्रगती च्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतात आणि संपत्ती वाढते.
 
* पाण्याच्या स्रोतांचे दोष -
घरात एखाद्ये चुकीच्या दिशेने पाण्याचा स्रोत असल्याने वास्तूदोष होतो त्यामुळे कुटुंबात शत्रूचे त्रास, आजारपण आणि मतभेद दिसून येतात. हे वास्तू दोष दूर करण्यासाठी त्या घरात असे पंचमुखी हनुमानाचे चित्र लावावे ज्यांचे तोंड त्या पाण्याचा स्रोतांकडे बघतानाचे असेल.
 
* बैठकीच्या खोलीत श्रीरामाच्या दरबाराचे चित्र लावावे -
बैठकीच्या खोलीत श्रीराम दरबाराचे चित्र लावावे जेथे हनुमानजी प्रभू श्रीरामाच्या पायाशी बसलेले आहे. या व्यतिरिक्त बैठकीच्या खोलीत पंचमुखी हनुमानाचे चित्र, हनुमानाचे डोंगर उचलतानाचे चित्र किंवा श्रीरामाचे भजन करतानाचे चित्र लावू शकता. लक्षात असू द्या की या पैकी कोणते एकच चित्र लावायचे आहे. 
 
* डोंगर उचलतानाचे हनुमानाचे चित्र लावावे -
हे चित्र घरात असल्याने घरातील माणसांमध्ये धैर्य, सामर्थ्य, विश्वास आणि जबाबदारी विकसित होते. माणूस कोणत्याही परिस्थितीत घाबरत नाही. असं केल्याने परिस्थिती आपल्याला लहान दिसेल आणि त्याचे निराकरण त्वरितच होईल.
 
* उडत असलेल्या हनुमानाचे चित्र -
उडत्या हनुमानाचे चित्र घरात लावल्याने आपल्याला प्रगती आणि यश मिळण्यापासून कोणी ही रोखू शकत नाही. आपल्याला पुढे वाढण्यासाठी उत्साह आणि धैर्याचा संचार होईल. त्यामुळे आपण सतत यशाच्या मार्गावर वाटचाल कराल. 
 
* प्रभू श्रीरामाचे भजन करतानाचे चित्र लावावे -
जर हे चित्र आपल्या घरात आहे तर आपल्यामध्ये भक्ती आणि विश्वास निर्माण होईल. हे भक्ती आणि विश्वासच आपल्या जीवनातील यशाचे आधार आहे.