शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 30 डिसेंबर 2020 (09:16 IST)

वर्षभर आनंद मिळविण्यासाठी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी हे काम करा

नवीन वर्षाच्या आगमनाला काहीच दिवस शिल्लक आहे. नवीन वर्षाचे स्वागत एका नव्या उत्साह आणि नव्या आनंदाने करा. वास्तूमध्ये काही उपाय सांगितले आहेत ज्यांच्या साहाय्याने आपण आयुष्याला पुढील प्रगतीकडे घेऊन जाऊ शकतो आणि येणारे वर्ष सकारात्मक ऊर्जेने आणि नव्या उत्साहाने जगू शकतो. चला तर मग या उपायां विषयी जाणून घेऊ या. 

* नवीन वर्षात आपल्या घरात किंवा संस्थांमध्ये ऊर्जेचे संतुलन राखण्याचा प्रयत्न करा.घरातील प्रवेशदारा मधून सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारांची ऊर्जा प्रवेश करते. 
* नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी चांदीचे स्वस्तिक दारावर लावा.
* या वर्षी आपल्या घरातील उत्तर दिशेला मजबूत करा. उत्तर दिशेमध्ये कुबेर देवांना स्थान द्या.या मुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये बुद्धी आणि ज्ञान विकसित होतो. 
* नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी भगवान श्रीकृष्णाची बासरी वाजवतानाची मूर्ती घरात आणा. 
* नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरातील दक्षिण पूर्वी कोणात क्रिस्टल बॉल लावा.
* वास्तुनुसार दक्षिण पश्चिम कोणात नाण्याचे पिरॅमिड ठेवल्याने आदर वाढतो.
* या दिवशी जुने कॅलेंडर काढून द्या. या मुळे प्रगतीच्या मार्गावर अडथळे येतात.
* नवीन वर्षाचे कॅलेंडर उत्तर -पश्चिमी किंवा पूर्वीकडे भिंतीवर लावणे शुभ मानतात. 
* घरातील दारावर विंड चाइम्स लावा.
* लाफिंग बुद्धा देखील शुभ मानतात.
* घरात धातूने बनलेला कासव ठेवा.
* आपल्या पर्स मध्ये आई लक्ष्मीचे बसलेले चित्र ठेवा. 
* वडिलधाऱ्यांकडून आशिर्वादात मिळालेल्या नोटांवर केसर आणि हळदीचा टिळा लावून नेहमी आपल्या पर्स मध्ये ठेवा.
* नवीन वर्षात कोणाकडून कर्ज घेऊ नका.
* आपल्या पर्स मध्ये नेहमी पैसे ठेवा.
* आई अन्नपूर्णाची कृपा मिळविण्यासाठी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एखाद्या गरजूला गहू दान द्या.