शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 डिसेंबर 2020 (15:30 IST)

नव्या वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आठ मतदारसंघांत निवडणूक

पुढील वर्षी विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आठ मतदारसंघांत निवडणूक होणार आहेत. यात मुंबई महानगरपालिकेतून निवडून आलेले रामदास कदम (शिवसेना) व भाई जगताप (काँग्रेस), नागपूरचे गिरीश व्यास (भाजप), सोलापूरचे आमदार प्रशांत परिचारक (अपक्ष-भाजप पुरस्कृत),कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे गृहराज्यमंत्री बंटी पाटील (काँग्रेस), धुळे-नंदूरबारमधून अलीकडेच पोटनिवडणुकीत निवडून आलेले अमरिश पटेल (भाजप), अकोला-बुलढाणा-वाशीमचे गोपीकिसन बजोरिया (शिवसेना), नगरचे अरुण जगताप (राष्ट्रवादी ) हे आठ आमदार पुढील वर्षी निवृत्त होत आहेत. या निवडणुकीत नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य हे मतदार असतात.
 
राज्यातील बहुतांशी नगरपालिकांची मुदत ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात संपत आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला नगरपालिकांची निवडणूक होईल. नगरपालिकांची निवडणूक झाल्यावर लगेचच विधान परिषदेची निवडणूक होईल. 
 
या मतदारसंघात निवडणूक
 
मुंबई – २ जागा
नागपूर
नगर
अकोला-बुलढाणा-वाशिम
कोल्हापूर
सोलापूर
धुळे-नंदुरबार