गडकरी यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांची भेट घेतली
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांची मुंबईत भेट घेतली. मुंबईत मनोहर जोशी यांच्या निवासस्थानी जाऊन नितीन गडकरींनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी नितीन गडकरी यांनी जोशी सरांना वाकून नमस्कार केला आणि आशीर्वाद घेतले. नितीन गडकरींच्या कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवर या भेटीचे फोटो ट्विट करण्यात आले आहेत.
मनोहर जोशी हे १९९५ ते १९९९ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी राज्यात शिवसेना आणि भाजप युतीचं सरकार होतं. युती सरकारमध्ये नितीन गडकरी यांच्याकडे त्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाची जबाबदारी होती.