शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020 (11:27 IST)

मराठी लोकांना घाटी संबोधले जायचे

एक अभिनेत्री असल्याचा, मराठी असल्याचा मी त्रास सहन केला आहे, मी अनेक गोष्टी भोग्ल्या आहेत. मी त्यावेळी नेपोटिझबद्दल बोलले नाही. मात्र आता मी या सगळ्या गोष्टी बोलते आहे. त्यावेळी मराठी लोकांना चित्रपटसृष्टीत घाटी असेही संबोधले जात होते, अशी खंत अभिनेत्री ऊर्मिला मांतोंडकर यांनी व्यक्त केली. एका कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. हिंदी सिनेसृष्टीत घराणेशाही ही चंद्र आणि सूर्य इतकीच लख्ख आहे, असे अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी म्हटले. 
 
कंगना राणावतने बॉलिवूडमधल्या घराणेशाहीविरोधात आवाज उठवला त्याबद्दल काय मत आहे, असा प्रश्न ऊर्मिला मातोंडकर यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी या प्रकरणावर भाष्य करताना घराणेशाही असल्याचे नमूद केले. 90 च्या दशकात 15 ते 16 अभिनेत्री माझ्यासोबत आल्या होत्या. त्यातल्या 11 ते 12 नट्या या कुणाच्या ना कुणाच्या नात्यात होत्या. त्यामुळे घराणेशाही किंवा नेपोटिझम हे आज आलेले नाही. ते अनेक वर्षांपासून आहे. हे फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर प्रत्येक क्षेत्रात आहे असेही त्या म्हणाल्या .