बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 6 ऑगस्ट 2020 (09:11 IST)

मुंबईतल्या अतिवृष्टीमुळे मोदी यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन केला आहे. मुंबईतल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. केंद्र सरकार सर्वतोपरी राज्य सरकारला मदत करेल, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलं. 
 
मुंबईमध्ये मंगळवारी एका दिवसात विक्रमी पावसाची नोंद झाली. कुलाब्याला २९३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी १० ऑगस्ट १९९८ ला २६१ मिमी पावसाची नोंद झाली होती, त्याचा विक्रम पावसानं मोडून काढलाय. मस्जिद रेल्वे स्थानकात अडकलेल्या २९० प्रवाशांची एनडीआरएफने सुखरुप सुटका केली आहे.