गुरूवार, 9 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 6 ऑगस्ट 2020 (08:36 IST)

टाइम्स स्क्वेअरला राम मंदिराचा फोटो झळकला

digital billboard-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन पार पडल्यानंतर देशभरात अनेक ठिकाणी आनंद साजरा करण्यात आला. सोबतच साता समुद्रापार अमेरिकेतही सेलिब्रेशन सुरु होतं. अमिरेकेतील न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरला राम मंदिराचा फोटो झळकला.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडत असतानाच न्यूयॉर्क शहरामधील टाइम्स स्क्वेअर येथे प्रभू श्रीराम आणि मंदिराची प्रतिमा झळकली. याआधी ही प्रतिमा झळकावण्यावरुन मतांतर होती. त्यामुळे याबाबत अनिश्चितता होती. मात्र अखेर ही प्रतिमा पाहण्याची संधी भारतीयांना मिळाली.
 
टाइम्स स्क्वेअरवरील स्क्रीन ही काही विशेष दिवसांच्या निमित्ताने रोषणाई करुन सजवली जाते. त्यासाठी ही स्क्रीन भाड्याने दिली जाते. वर्तुळाकार अशा या एलईडी स्क्रीनवर प्रभू रामांची प्रतिकृती झळकवली गेली. जगभरातील विशेष दिवसांचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या टाइम्स स्क्वेअरवर ही असल्याने तिला अधिक महत्व आहे.