शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 6 ऑगस्ट 2020 (08:31 IST)

सोने -चांदीच्या दराची वाढ सुरूच

जागतिक आणि देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या दराची वाढ सुरूच आहे. एमसीएक्स वायदे बाजारात सोन्याचे प्रतितोळ्याचे म्हणजे 10 ग्रॅमचे दर 55 हजार रुपयांजवळ पोहोचले आहेत. वायदे बाजारात बुधवारी सोन्याचे तोळ्याचे दर 54 हजार 797 रुपयांवर पोहोचले होते.
 
सोन्याबरोबर  चांदीचे प्रतिकिलोचे दर 0.09 टक्क्याने वाढून 69 हजार 861 रुपयांवर गेले. मंगळवारी सोने दरात 900 रुपयांची तर चांदी दरात 4200 रुपयांची तेजी आली होती. अमेरिका-चीन यांच्यादरम्यानचा तणाव, कोरोना संक्रमण, आर्थिक अस्थिरता, कमी व्याजदर, इतर चलनाच्या तुलनेत कमजोर होत असलेला डॉलर आदी कारणांमुळे सोने-चांदीसह इतर धातूंच्या दरात प्रचंड तेजी आलेली आहे. 
 
जागतिक बाजारपेठेत सोन्याचे प्रती औंसचे दर दोन हजार डॉलर्सच्याही पुढे गेले आहेत. चालू वर्षी जागतिक बाजारात सोन्याच्या दरात 33 टक्क्यांची तेजी आलेली आहे.