अयोध्येतील निमंत्रिताना चांदीच्या नाण्यांची भेट
अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी येणाऱ्या आमंत्रितांना भूमिपूजनाची आठवण म्हणून चांदीचं नाणं देण्यात येणार आहे. या चांदीच्या नाण्याच्या एका बाजूला प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांचं छायाचित्र असेल. तर दुसऱ्या बाजूला राम मंदिर ट्रस्टचं चिन्ह असणार आहे.
चांदीच्या नाण्यांव्यतिरिक्त आमंत्रितांना लाडवाचा बॉक्सही देण्यात येणार आहेत. कार्यक्रम दरम्यान तब्बल १.२५ लाख लाडूंचं वितरण केलं जाणार आहे. यांना रघुपती लाडू म्हणून ओळखलं जातंय. हे लाडू इतर जिल्ह्यांतून येणाऱ्या भाविकांनाही वाटले जाणार आहेत.