मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 डिसेंबर 2020 (09:10 IST)

जाणता राजा नव्हे, तर शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारा राजा म्हटलं जाईल : सदाभाऊ खोत

"शरद पवार यांनी खरं बोलावं. कारण ज्यावेळी महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी पवारांना शेतकऱ्यांचा जाणता राजा नव्हे, तर शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारा राजा म्हटलं जाईल", अशी टीका रयत क्रांती संघटनेचे नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे. सांगलीत भाजपच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या किसान आत्मनिर्भर यात्रेमध्ये ते बोलत होते. 
 
यावेळी शरद पवार हे दुटप्पी भूमिका घेणारे नेते असल्याचं खोत म्हणाले. "पवार साहेबांचं काही मनावर घेऊ नका. ते जे बोलतात त्याच्या नेहमी उलटं करतात. त्यांनी जर म्हटलं की सूर्य उद्यापासून पूर्वेकडे उगवणार तर सूर्य पश्चिमेकडे उगवणार. पवारांनी त्यांच्या आत्मचरित्रात मार्केट कमिट्या बंद झाल्या पाहिजेत, शेतकऱ्यांचा शेतमाल कुणालाही खरेदी करता आला पाहिजे असं म्हटलंय. पण दुसरीकडे पवार म्हणतात की त्यांचा दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आहे. त्यामुळे शरद पवारांचं आत्मचरित्र वाचावं की न वाचावं असा प्रश्न पडलाय", असं सदाभाऊ खोत म्हणाले.