रविवार, 2 एप्रिल 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified सोमवार, 21 नोव्हेंबर 2022 (22:04 IST)

संजय राऊतांना भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांचा टोला

sanjay raut
शिवसेना(ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी यामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते, असा सूचक इशाराही काँग्रेसला दिला होता. त्यामुळे राजकीय चर्चांना जोरदार उधाण आले होते. दरम्यान, आता खुद्द राहुल गांधी यांनीच संजय राऊतांना फोन केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे संजय राऊत यांनी स्वत: ही माहिती ट्वीटद्वारे दिली आहे. त्यानंतर आता संजय राऊतांना भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांना टोला लगावला आहे.
 
“बाळासाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त ट्विटरवरून श्रद्धांजली का वाहिली नाहीत? असं राहुल गांधींना विचारता आलं असतं. ओलावा संपला आहे. लाचारीत तो दिसतोय, सर्वज्ञानी संजय राऊत. ” असं चित्रा वाघ यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे. सोबत त्यांनी संजय राऊतांचं ट्वीट जोडलेलं आहे.