1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 नोव्हेंबर 2022 (08:47 IST)

सुषमा अंधारे यांनी कोल्हापुरातून शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला

Sushma Andhare
सुषमा अंधारे यांनी कोल्हापुरातून शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अंधारे यांनी शिंदे गट आणि भाजपाच्या नेत्यांकडून महिलांबाबत केलेल्या विधानांचा समाचार घेतला आहे. यावेळी त्यांनी भाजपाचे सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष, शिवसेना खासदार राहुल शेवाळे, गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार आदि नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. त्या कोल्हापूर येथे महाप्रबोधन यात्रेत बोलत होत्या.
 
यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या की, सध्याच्या सरकारमध्ये महिलांचा कशा पद्धतीने अपमान केला जातो, ते अत्यंत वाईट आहे. सोलापूरचा भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षांसोबत एका महिलेनं हॉटेलमधून व्हिडीओ जारी केला होता. त्या व्हिडीओमध्ये संबंधित महिला स्वत:चं नाव सांगतं होती, संबंधित जिल्हाध्यक्षांचं नाव सांगत होती. त्यांच्या दोघांत काय नातं आहे? त्याचा खुलासा करत होती, हा माणूस अत्यंत नीच आहे, असंही ती महिला म्हणत होती. पण भारतीय जनता पार्टीने त्याच्याविरोधात विनयभंगाचा किंवा बलात्काराचा गुन्हा दाखल केला नाही.

Edited By- Ratnadeep Ranshoor