गुरूवार, 17 एप्रिल 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 15 एप्रिल 2025 (18:57 IST)

बीडमध्ये भाजप पदाधिकाऱ्याची भरदिवसा धारदार शस्त्राने हत्या

murder
बीडच्या माजलगाव शहरात मंगळवारी दुपारी भाजप पक्षाच्या पदाधिकाऱ्याची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना  किट्टियाडगाव घडली आहे.येथील भाजप लोकसभा विस्तारक बाबासाहेब प्रभाकर आगे (35) यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  
दुपारी माजलगावात श्री स्वामी समर्थ केंद्र परिसराजवळ बायपास रस्त्यावर आरोपी हातात कुऱ्हाड घेऊन आगे यांचा पाठलाग करत होता. आगे आपला जीव वाचविण्यासाठी माजलगाव बस स्थानकाजवळ शाहूनगर येथे पळाले परंतु आरोपीने त्यांना समर्थ केंद्राजवळील रस्त्यावर गाठले आणि त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केला. 
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आगे यांच्या पोटावर आणि डोक्यावर दोनदा हल्ला केला. नंतर आरोपी तिथून पसार झाला. 
घटनेची माहिती लोकांनी पोलिसांना दिल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि आगे यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हल्ल्यानंतर आरोपीने पोलीस ठाणे गाठले आणि स्वतःहून पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. आरोपीने हे कृत्य का केले अद्याप हे कळू शकले नाही. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit