गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुंबईत 110 जागांवर विजयाचा अंदाज- शिवसेना

मुंबई महापालिकेसाठी यंदा विक्रमी 55.28 टक्के इतके मतदान झाले आहे. वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार, कोणाला फटका बसणार याची चर्चा सुरू झाली असताना, शिवसेनेच्या अंतर्गत यंत्रणेचा फीडबॅक रिपोर्ट एका वृत्तवाहिनीच्या हाती लागला आहे.
 
या सर्व्हेनुसार स्वबळावर सत्तेपर्यंत पोहोचू असा अंदाज शिवसेनेला आहे. शिवसेनेने एकूण 227 जागांपैकी 202 जागांचा अंदाज बांधला आहे. या 202 जागांपैकी तब्बल 110 जागांवर विजय मिळेल असा अंदाज आहे.
 
मुंबईत स्वबळावर सत्ता स्थापण्यासाठी 114 जागांची गरज आहे. त्यामुळे हा आकडा सहज पार करू असा अंदाज शिवसेनेने आपल्या सर्व्हेतून वर्तवला आहे.