शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 18 जून 2024 (16:39 IST)

वसई : भररस्त्यात प्रियकराने प्रेयसीची हल्ला करत केली निर्घृण हत्या,आरोपी प्रियकराला अटक

murder
मुंबईच्या वसईपूर्व चिंचपाडा परिसरात एका प्रियकराने प्रेयसीची भरस्त्यावर निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी 8:30 च्या सुमारास  घडली आहे. या प्रकरणी आरोपी प्रियकराला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

सदर घटना  मंगळवार सकाळची आहे. लोखंडी पानाने डोक्यात आणि छातीत हल्ला करत एका माथेफिरू प्रियकराने प्रेयसीची रस्त्याच्या मधोमध निर्घृण हत्या केली. आरती यादव(20) असे या मयत तरुणीचे नाव आहे.
तर रोहित यादव असे या आरोपीचे नाव आहे. प्रेम प्रकरणातून असे केल्याचे समोर आले आहे. आरोपीने लोखंडी पानाने तरुणीच्या डोक्यात 15 वार केले. त्यावेळी रस्त्यावर कामाला जाणाऱ्यांची वर्दळ होती.

हल्ला केल्यावर तरुणी भररस्त्यावर पडली होती. धक्कादायक म्हणजे भर रस्त्यावर गर्दी असून देखील कोणीही तरुणीच्या मदतीला आले नाही. अनेकांनी या मध्ये बघ्याची भूमिका बजावली. या घटनेत एक जण मध्यस्थी करायला आला मात्र त्याच्यावर देखील या आरोपीने हल्ला केला. नंतर कोणीही मुलीच्या मदतीला आले नाही. 

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून व्हिडीओ मध्ये दिसत आहे की तरुणी पंजाबी ड्रेस घातलेली असून भररस्त्यात रक्ताच्या थारोळ्यात पडली असून हा आरोपी तिच्या मृतदेहाच्या शेजारी हातात लोखंडी पाना घेऊन उभा आहे. घटने नंतर माझ्या सोबत असं का केलं असं म्हणत हा आरोपी तरुण ओरडत आहे.

या दोघांचे काही दिवसांपूर्वी ब्रेकअप झाले होते. या तरुणीने आरोपीशी संबंध तोडले आणि इतर काही मुलांशी तिचे संबंध असल्याचा संशय तरुणाला होता. ब्रेकअप झाल्याचा राग या तरुणाला आला आणि त्याने चक्क तरुणीचा जीव घेतला.

या घटनेची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी या आरोपीला ताब्यात घेतले. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.   
 
Edited by - Priya Dixit