1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 19 मे 2024 (16:59 IST)

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

rape
अकोला येथे एका खासगी कुस्ती प्रशिक्षण केंद्रात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनय भंग तिच्या कुस्ती कोच ने केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी बाल संरक्षण कायद्यांवये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून कुस्ती कोचला अटक केली आहे. अजून मुलगी या धक्क्यातून सावरली नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी 9 मे रोजी पासून बेपत्ता होती. या प्रकरणी कुटुंबीयांनी जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तसेच पोलिसांनी महिला व बाल कल्याण समितीला माहिती दिली. 
 
शोध लागल्यानन्तर मुलीचे म्हणणे ऐकल्यावर समजले की मुलगी ज्या संस्थेत कुस्तीचं प्रशिक्षण घेण्यासाठी जात होती. तिथल्या कोच ने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तसेच महामार्गावरून जात असताना त्याने तिला सोबत नेण्याचा प्रयत्न केला. तिच्यासोबत तो अनेक दिवसांपासून गैरवर्तन केल्याचे समजले. पोलिसांनी कोचला ताब्यात घेत त्याच्यावर अपहरणाच्या संशयावरून आणि विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे. 
 
Edited by - Priya Dixit