रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 मे 2024 (17:01 IST)

वाशिममध्ये दोन कारची धडक, एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रातील वाशिम येथे दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व एकाच कुटुंबातील होते. अकोला पातूर जवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन कारची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. अपघाताची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी पोहोचले. 

हा अपघात अकोला वाशीम मार्गावर दुपारी पातूर उड्डाणपुलाजवळ दोन कारची समोरासमोर धडक होऊन  झाला.या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. तर इतर गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.  
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशीम कडून अकोला कडे पातूर मार्गाने जात असताना विरुद्ध दिशेने समोरून येणाऱ्या कार ला धडकली आणि अपघात झाला.  या अपघातग्रस्त कार मध्ये अमरावती जिल्ह्यातील शिक्षक मतदार संघाचे आमदार  किरण सरनाईक यांचे कुटुंबातील सदस्य होते. अपघातात 4 जण जागीच ठार झाले.तर दोघांचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. या अपघातात आमदार किरण सरनाईक यांचा पुतणा, मुलगी आणि नातं देखील होते. त्यांचा मृत्यू झाला आहे. अपघातात गाड्यांचा अक्षरश:चुरडा झाला आहे. अपघातानंतर वाहतूक कोंडी झाली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली असून पुढील तपास करत आहे.    
 
 Edited By- Priya Dixit