बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (15:30 IST)

महाराष्ट्र व गुजरातला जोडणारा पूल गुरूवारी सकाळी अचानक कोसळला

bridge collapsed
राज्य मार्ग क्रमांक ६ वर असलेला व महाराष्ट्र व गुजरातला जोडणारा रंका नदीवरील धानोरा ते ईसाईनगर दरम्याचा पूल गुरूवारी सकाळी अचानक कोसळला. सुदैवाने कुठलीही जीवीत हानी झाली नाही.
 
गेल्या अनेक दिवसांपासून या पुलाला तडे गेले होते. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. गुरूवारी सकाळी अचानक मोठा आवाज करीत हा पूल कोसळला. एकुण सहा गाळ्यांपैकी तीन गाळे कोसळले. सुदैवाने या वेळी एकही वाहन जात नव्हते त्यामुळे जीवीत हानी झाली नाही. हा मार्ग नंदुरबार ते गुजरात मधील उच्छल व पुढे सुरत जाण्यासाठी सोयीचा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या मार्गावर वाहतूक असते. आता पूल कोसळल्याने गुजरात कडील वाहतूक ठप्प होणार आहे. या घटनेची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor
Published by : Rupali Barve