शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 30 सप्टेंबर 2024 (16:07 IST)

बारामतीत बारावीच्या विद्यार्थ्याची निर्घृण हत्या, संशयिताला अटक

murder
पुण्यातील बारामती येथे एका महाविद्यालयातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा त्याच्याच वर्गमित्राने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित आणि आरोपी दोघेही अल्पवयीन आहे. संशयितला पोलिसांनी अटक केली आहे.

सदर घटना सोमवारी सकाळी 11:30 च्या सुमारास घडली असून दोघांमध्ये वादावादी झाली आणि रागाच्या भरात येऊन एकाने दुसऱ्यावर कोयत्याने वार केला. या हल्ल्यात पीडित गंभीर जखमी झाला.त्याला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले असून डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळ गाठून हल्लेखोरांना   अटक केली. आरोपीसह त्याचा एक वर्गमित्र असल्याचे म्हटले जात आहे.  

या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या वर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर वाढत्या गुन्हेगारी बद्दल टीका केली आहे. त्या म्हणाल्या, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अपयशामुळे राज्यात गुंडगिरी वाढत आहे. चाकू, पिस्तूल, तलवारी सर्रास घेऊन फिरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असल्याचे त्या म्हणाल्या. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 
Edited by - Priya Dixit