शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 30 सप्टेंबर 2024 (15:45 IST)

ठाण्यातील एमरॉल्ड प्लाझा रेस्टोरेंटला भीषण आग, सुदैवाने जीवित हानी नाही

महाराष्ट्रातील ठाणे शहरातील एमराल्ड प्लाझा येथील बार आणि रेस्टॉरंटमध्ये भीषण आग लागली. ठाणे महानगरपालिकेच्या (TMC) अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी मध्यरात्री एमराल्ड प्लाझाच्या पहिल्या मजल्यावरील बार आणि रेस्टॉरंटमध्ये आग लागली.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5गाड्या आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या. आगीमुळे रेस्टॉरंट परिसरात धुराचे लोट पसरले. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यात अडचणी आल्या.
 
सुदैवाने या अग्निकांडात कोणतीही जीवित हानी झाली नाही. आगीचे कारण शॉर्ट सर्किट असावे अशी शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी चौकशी सुरु आहे. 
Edited by - Priya Dixit