शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 30 सप्टेंबर 2024 (13:02 IST)

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेंवर अंत्यसंस्कार, स्मशानभूमी छावणीत बदलली

mumbai police
बदलापुरातील शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेचा चकमकीत मुत्यू झाला. त्याच्यावर बदलापुरात अंत्यसंस्कार होऊ देणार नाही अशी मागणी स्थानिकांनी केली असून न्यायालयाच्या आदेशानुसार, उल्हासनगर शांतीनगर स्मशानभूमीत पोलीस बंदोबस्तात सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी स्थानिकांच्या विरोधामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली. या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तीत दफन करण्यात आला. 

बदलापुरात एका शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार करण्यात आला सदर घटना जुलै महिन्यात घडली. नागरिकांनी तीव्र निषेध व्यक्त करत बदलापुरात रेल रोको आंदोलन केले. या प्रकरणी  कल्याण न्यायालयात 500 पाणी आरोपपत्र दाखल करण्यात आले. 

त्याचा  23 सप्टेंबर रोजी सायंकाळी ठाण्यातील मुंब्रा बायपास येथे पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. त्याच्यावर बदलापुरात अंत्यसंस्कार होऊ नये अशी मागणी धरत शहरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आली. मोठ्या विरोधानंतर कडेकोट पोलीस बंदोबस्तीत आरोपी अक्षय शिंदेला कुटुंबीयांसमोर दफन करण्यात आले. 

न्यायालयाच्या आदेशानुसार, पोलिसांनी रविवारी सकाळी उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत दफन करण्यासाठी खड्डा खोदण्यात आला स्थानिक नागरिक या वेळी जमा झाले. या ठिकाणी तणावाची स्थिती निर्माण झाली. आरोपीचे अंत्यसंस्कार या ठिकाणी होऊ देणार नाही अशी घोषणाबाजी करण्यात आली. नागरिकांची वाढणाऱ्या गर्दीला पाहता पोलिसांनी या ठिकाणी छावणीचे रूप दिले आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.   
Edited by - Priya Dixit