सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 सप्टेंबर 2024 (13:16 IST)

अक्षय शिंदेच्या मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी जागेचा शोध

बदलापूरच्या खासगी शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे हा पोलीस चकमकीत ठार झाला. या प्रकरणावर सध्या न्यायालयात सुनावणी सुरु आहे. 

अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला आहे. अक्षयच्या कुटुंबीयांनी त्याला दफन करण्याचा निर्णय घेतला आहे. या साठी बदलापूरच्या जवळच जागेचा शोध सुरु आहे. 

अक्षयच्या मृतदेहावर आधी अंत्यसंस्कार बदलापुरातील मांजर्ली स्मशानभूमीवर करण्यात येणार होते. मात्र बदलापुरातील नागरिकांनी त्याचे अंत्यसंस्कार बदलापुरात होऊ देणार नाही असे ठामपणे सांगितल्यावर त्याचा मृतदेहावर दहन होणार नसून त्याला दफन करण्यात येईल असा निर्णय अक्षयच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. जेणे करून भविष्यात काही पुरावे लागले तर अक्षयचे मृतदेह बाहेर काढता यावे. या साठी त्याला दफन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी जागेचा शोध सुरु आहे. जागा मिळाल्यावर त्याला दफन करण्यात येईल. 

सोमवारी आरोपी अक्षयला एका दुसऱ्या केसच्या संदर्भात चौकशीसाठी तळोजा येथून बदलापूरला नेत असताना त्याने पोलिसांची बंदूक हिसकावून त्यांच्यावर गोळीबार केला. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी त्याच्यावर गोळीबार केला. या चकमकीत त्याच्या डोक्याला गोळी लागली आणि अतिरक्तस्रावामुळे त्याच्या मृत्यू झाला. या एन्काउंटरवर सध्या प्रश्न उपस्थित केले जात असून अक्षयच्या कुटुंबीयांनी हे फेक एन्काउंटर असल्याचे सांगत कोर्टामध्ये धाव घेतली असून या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी सुरु आहे. 
Edited by - Priya Dixit