सोमवार, 15 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 15 मार्च 2023 (08:35 IST)

दारूच्या नशेत वृद्ध आई व मोठ्या भावाचा निर्घृण खून

murder
देवगड : देवगड तालुक्यातील बापर्डे सकपाळवाडी येथे राहणाऱ्या श्रीमती शोभा मुरारी सकपाळ (८०) व महेंद्र मुरारी सकपाळ (५६) यांना सोमवारी मध्यरात्री च्या सुमारास संशयित भारत मुरारी सकपाळ (५०) याने दारूच्या नशेत निर्घृण खून केला. दोघांच्याही तोंडात चुलीतील राख कोंबून दांड्याने मारहाण करून ठार मारले.
 
याप्रकरणी देवगड पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. संशयित आरोपी भारत सकपाळ याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपी याने २००८ मध्ये आपल्या पत्नीचा हेल्मेट डोक्यावर मारून खून केल्याप्रकणी नुकताच शिक्षा भोगून आलेला होता. शिक्षा भोगून आल्यानंतर बापर्डे सकपाळवाडी येथील घरी आई व मोठया भावासोबत राहत होता.  रात्री दारूच्या नशेत आई व भावाशी भांडण करून त्यातून आई व भावाचा खून केल्याचे समजते.
Edited by : Ratnadeep Ranshoor