गुरूवार, 30 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified शनिवार, 28 मे 2022 (15:00 IST)

एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या, मृतदेह घरापासून दूर विहिरीत आढळले

murder
राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.जयपूरच्या दुडू शहरात तीन महिला आणि दोन मुलांची हत्या करण्यात आली होती, त्यानंतर विहिरीतून एकूण 5 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.मृत्युमुखी पडलेल्या तीनपैकी दोन महिला गर्भवती होत्या. 
 
प्राथमिक माहितीनुसार, सासरच्या लोकांनी हुंड्याच्या लालसेपोटी तिन्ही महिला आणि दोन मुलांची हत्या केली आहे. ज्या महिलांचे (सर्व बहिणी) मृतदेह सापडले त्यात कालुदेवी आणि तिच्या दोन बहिणींचा समावेश आहे.  
 
कालू देवी यांच्या दोन मुलांचे (एक 4 वर्षांचे आणि दुसरे 27 दिवसांचे) मृतदेहही सापडले आहेत. तर त्याच्या दोन बहिणी ममता देवी आणि कमलेश यांचेही मृतदेह शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर याच विहिरीतून सापडले आहेत.  
 
कालू देवीच्या दोन्ही बहिणी गरोदर होत्या आणि त्यांची प्रसूती कोणत्याही क्षणी होऊ शकत होती. एकाच वेळी पाच मृतदेह सापडल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी पोहोचले असून मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बुधवार संध्याकाळपासून या 3 सख्ख्या बहिणीं त्यांची दोन मुलांसह बेपत्ता होत्या. रिपोर्टनुसार, पंधरा दिवसांपूर्वी मोठ्या बहिणीला मारहाण करून तिच्या डोळ्याला दुखापत झाली होती. ती काही वेळापूर्वी रुग्णालयातून परतली होती आणि सासरच्यांकडून सतत हुंड्याची मागणी होत होती. पोलीस प्रकरणाचा तपास लावत आहे.