1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified शनिवार, 28 मे 2022 (14:41 IST)

बस पलटी होऊन झालेल्या अपघतात 25 जखमी

accident
जम्मूच्या डोडा जिल्ह्यातून येणारी बस उधमपूरच्या बत्तल बालियान भागात पलटी झाल्याने 25 प्रवासी जखमी झाले. काही जखमींना उधमपूरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून 6 जखमींना जम्मूच्या सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. 
 
हा रस्ता अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप मिळालेली नाही. पोलिसांचे पथक अपघाताचा तपास करत आहे. झोपेमुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले असावे, त्यामुळे हा अपघात झाला असावा, असे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, इतर बाबींवरही लक्ष ठेवले जात आहे. जखमींवर चांगले उपचार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.