नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यावर आणि त्यांच्या भावावर चाकूने वार, हल्लेखोर फरार
Nashik News: महाराष्ट्रातील नाशिकमधून हत्येची धक्कादायक बातमी आली आहे. नाशिकच्या उपनगरातील आंबेडकरवाडीमध्ये दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना बुधवारी रात्री उशिरा ११:३० च्या सुमारास पुणे महामार्गाजवळील आंबेडकरवाडी परिसरात घडली. या हत्येनंतर परिसरात खळबळ उडाली. उमेश उर्फ मुन्ना जाधव आणि प्रशांत जाधव अशी मृतांची नावे आहे. या दोन्ही भावांवर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार उमेश जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) शहर उपाध्यक्ष होते. ही घटना बुधवारी रात्री ११:३० च्या सुमारास पुणे महामार्गाजवळील आंबेडकरवाडी परिसरात घडली. या हत्येनंतर परिसरात खळबळ उडाली. खून केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. सध्या तरी हत्येमागील कारण स्पष्ट झालेले नाही. पण या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण नाशिकमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेबाबत नाशिक उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
Edited By- Dhanashri Naik