बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 18 मार्च 2017 (10:39 IST)

राज्याचा अर्थसंकल्प शनिवारी सादर केला जाणार

राज्याचा अर्थसंकल्प शनिवारी  सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. मात्र कर्जमाफीची मागणी आणि सभागृहात होणाऱ्या गोंधळाचं या अर्थसंकल्पावर सावट असल्याने नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं आहे.याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कॅबिनेटच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री सभागृहात याबाबत निवेदन करतील. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत दुपारी 2 वाजता अर्थसंकल्पाचं वाचन सुरु करतील. तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर विधान परिषदेत अर्थसंकल्पाचं वाचन करतील.