जळगाव: यावलमध्ये बेपत्ता असलेल्या ६ वर्षांच्या मुलाचा जळालेला मृतदेह आढळला
जळगाव जिल्ह्यातील यावल शहरातील बाबूजी पुरा परिसरात राहणारा सहा वर्षांचा मुलगा शुक्रवारी संध्याकाळपासून बेपत्ता होता. त्याचा शोध सुरू असताना शनिवारी त्याच्या घराशेजारी असलेल्या एका बंद घरात मुलाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला. ही घटना उघडकीस आल्यानंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि यावलमध्ये दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार यावल शहरातील सहा वर्षांचा मुलगा शुक्रवार ५ सप्टेंबरपासून बेपत्ता होता. त्याचा सर्वत्र शोध घेतला जात होता. शनिवारी, त्याच्या शेजारी असलेल्या दुमजली घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत मुलाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला. या घटनेची माहिती शहरात पसरताच घटनास्थळी मोठी गर्दी जमली. परिस्थितीचे गांभीर्य पाहून पोलिसही घटनास्थळी पोहोचले. शहरातील तणावपूर्ण वातावरण पाहता मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, मुलाचा मृतदेह जळगावच्या सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे.पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Edited By- Dhanashri Naik