शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 फेब्रुवारी 2022 (08:47 IST)

पण त्यातील स देखील बाहेर आला नाही :मनसे

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट करण्याचा दावा केला होता. पण त्यांनी सर्वांची पुरती निराशा केली. त्यामुळे संजय राऊत यांच्यावर फसवणुकीचा, 420 कलमांतर्गत गुन्हा दाखल करावा. त्याचबरोबर शिवजयंतीला बंधनं घालणाऱ्यांनी याकडे अधिक लक्ष द्यायला पाहिजे की आज ज्या पद्धतीची गर्दी जमली होती, संजय राऊत हे भाजपमधील साडेतीन लोकांची नावं सांगणार होते. पण त्यातील स देखील बाहेर आला नाही, असंही मनसेच्या संदीप देशपांडे म्हणाले आहेत.
 
संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेमुळे कोरोना पसरणार नाही का? कोरोना पसरवायला ही गर्दी नव्हती का? याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवं. आजची पत्रकार परिषद शिवसेनेचे नव्हती तर संजय राऊत यांची वैयक्तिक होती. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे महत्वाचे मंत्री नव्हते. तसंच आजची पत्रकार परिषद नाही तर केवळ भाषण होतं, अशी टीकाही देशपांडे यांनी केलीय. नेत्यांनी नातेवाईकांच्या नावे संपत्ती करू नये, जेणेकरून अशा पद्धतीची कारवाई होणार नाही, असा सल्लाही त्यांनी दिलाय.