शनिवार, 4 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 फेब्रुवारी 2022 (08:27 IST)

सात वर्षापूर्वी अल्पवयीन मुलीचे झाले होते अपहरण; अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाने १५ दिवस तपास केला

The minor girl was abducted seven years ago; Unethical human trafficking prevention cell investigated for 15 daysसात वर्षापूर्वी अल्पवयीन मुलीचे झाले होते अपहरण; अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाने १५ दिवस तपास केला Marathi Regional News  In Webdunia Marathi
अहमदनगर 23 सप्टेंबर 2015 रोजी राहुल गौंड याने अल्पवयीन मुलीस नगर शहरातील एका उपनगरातून पळून नेले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सात वर्ष एमआयडीसी पोलिसांना या गुन्ह्याचा तपास लागला नाही. मात्र अपहरीत मुलीचा व आरोपीचा शोध अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाने 15 दिवसात लावला.आरोपी राहुल सिंग गौंड (रा. कटरा, बलखेडा ता. पाटण जि. जबलपुर, मध्यप्रदेश), अपहरीत मुलगी व त्यांच्या दोन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपासकामी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरचा गुन्हा 28 जानेवारी 2022 रोजी अनैतिक मानवी वाहतुक कक्षाकडे तपासकामी वर्ग करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक भैय्यासाहेब देशमुख करीत होते.
 
त्यांनी आरोपी गौंड याच्या मोबाईलचे लोकेशन काढले असता तो कटरा बेलखेडा (ता. पाटणा जि. जबलपूर, मध्यप्रदेश) येथे असल्याची माहिती समोर आली. पोलीस निरीक्षक भिमराव नंदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक देशमुख यांच्या पथकातील पोलीस अंमलदारांनी कटरा बेलखेडा येथे जावुन आरोपीसह अपहरीत मुलगी व दोन मुलांना ताब्यात घेत एमआयडीसी पोलिसांकडे दिले आहे.