बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 9 ऑगस्ट 2022 (10:28 IST)

शिंदे-फडणवीस सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार, 18 मंत्री घेणार शपथ

shinde fadnais
एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा आज शपथविधी होणार आहे. एकूण 18 मंत्री शपथ घेणार आहेत. सर्व आमदारांची आज सकाळी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. आता राजभवनावर 11 वाजता शपथविधी होईल. केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून भाजप नेते विनोद तावडे उपस्थित राहणार आहे.
 
वर्ष 2014. युतीचं सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं. खाते वाटप झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपाच्या पहिल्या फळीच्या नेत्यांमध्ये कुरबुरी सुरू झाल्या. यापैकी एक एकनाथ शिंदे सुद्धा होते. त्यांना रस्ते वाहतूक विकास खातं मिळालं. एकनाथ शिंदे चिडले आणि त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली.
आज 18 मंत्र्यांचा होणार शपथविधी- उदय सामंत
आज होणाऱ्या शपथविधीत 18 मंत्री शपथ घेणार आहेत. त्यात भाजपचे 9 आणि शिंदे गटाच्या 9 मंत्र्यांचा समावेश आहे. अशी माहिती शिवसेना गटाचे आमदार उदय सामंत यांनी दिली आहे. संभाव्य मंत्र्यांमध्ये
 
उदय सामंत
गुलाबराव पाटील
दादा भुसे
संदीपान भुमरे
संजय राठोड
अब्दुल सत्तार
तानाजी सावंत
दीपक केसरकर
शंभूराजे देसाई यांचा समावेश आहे.