शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 8 ऑगस्ट 2022 (16:57 IST)

Eknath Shinde : एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या

devendra fadnavis eaknath shinde
राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर उद्या सकाळी 11 वाजता होणार आहे, अशी माहीती समोर आली आहे.10 ते  15  मंत्र्यांचा उद्या शपथविधी होण्याची शक्यता आहे.दरम्यान राजभवनवर हा नवीन मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवरून आल्या नंतर मंत्रिमंडळ विस्तारासाठी ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती सूत्रां कडून मिळाली आहे. 
 
 राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. दरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहुर्त मिळाला आहे. या विस्तारात गृहमंत्री पद फडणवीस यांच्याकडे राहण्याची शक्यता असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेसुध्दा मंत्रिमंडळात असतील. सध्या खात्यांची जबाबदारी सचिवांकडे देण्यात आली आहे त्यामुळे कोणत्याही खात्याचे काम थांबले नाही. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना सांगितले.