1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 8 ऑगस्ट 2022 (16:34 IST)

Chandrapur :13 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार

Chandrapur 13-year-old minor student raped
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात असलेल्या एका आश्रम शाळेच्या अधीक्षकाने 13 वर्षाच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या खाजगी आश्रम शाळेतील अधीक्षकाने इयत्ता आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर बलात्कार केला. या आश्रम शाळेत 360 मुलं असून त्यात 120 मुली आहे. पीडित मुलीचं कुटुंब चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील असून रोजगारानिमित्त हिंगणघाट गेलं आणि शिकण्यासाठी या मुलीला या आश्रमशाळेत दाखल केलं. मुलीची  प्रकृती अचानक बिघडल्यान तिच्या पालकांना तिला आश्रमशाळेतून घेऊन जाण्यास सांगितलं. घरी नेल्यावर मुलीने आपल्यासोबत घडलेलं आपल्या पालकांना सांगितल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पालकांनी या घटनेची तक्रार पोलिसात दाखल केली असून पोलिसांनी आश्रमाचा अधीक्षकाला अटक केली आहे. आणि या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.