शुक्रवार, 12 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 8 ऑगस्ट 2022 (13:33 IST)

Cricketer dies : बॉल लागून क्रिकेटरचा मृत्यू

क्रिकेट खेळत असताना एका तरुणाच्या गुप्तांगाला चेंडूचा मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी (ता. 6) दुपारी तावशी (ता.पंढरपूर) येथे घडली. विक्रम गणेश क्षीरसागर (वय 35, रा. नेपतगाव, ता. पंढरपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.याप्रकरणी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. एका महापुरुषाच्या जयंतीच्या निमित्ताने तावशी (ता.पंढरपूर) येथील माणनदीच्या पात्रात क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. या क्रिकेट स्पर्धेत नेपतगाव येथील संघ सहभागी झाला होता. दरम्यान दुपारी क्रिकेट खेळत असताना विक्रम क्षीरसागर याच्या गुप्तांगाला चेंडूचा जोरात मार लागल्याने तो जागेवरच कोसळला. यावेळी त्याला त्याच्या मित्रांनी तातडीने पंढरपूर येथील एका खासगी रुग्णालायात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान विक्रम याचा मृत्यू झाला. नेपतगाव येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.