1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: शनिवार, 6 ऑगस्ट 2022 (16:48 IST)

Home Remedies To Control HIgh BP : हाय बीपी नियंत्रणात ठेवण्याचे घरगुती उपाय

blood pressure
Home Remedies to Control BP :उच्च रक्तदाबात चक्कर येतात, डोकं गर -गर  फिरायला लागतं, कुठल्याही कामात मन लागत नाही. रुग्णाला शारीरिक श्रम करण्याची क्षमता नसल्या सारखी होते. रुग्णाला नीट झोप येत नाही.
 
या आजारावर काही घरगुती उपाय अवलंबवल्याने या त्रासात आराम मिळतो, चला तर मग जाणून घेऊ या.
 
* तीन ग्रॅम मेथीदाणा पूड सकाळ-सायंकाळ पाण्यासोबत घ्यावी. 15 दिवस सतत याचे सेवन केल्याने उच्च रक्तदाबाच्या समस्येवर नक्कीच आराम पडतो. ही पूड मधुमेहीच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर आहे.
 
* कणीक व बेसन सम मात्रेत घेऊन त्याच्या पोळ्या तयार करून खाल्लयाने 10 दिवसातच उच्च रक्तदाबात आराम मिळतो.
 
* टरबुजाच्या बियांची गिरी आणि खसखस सम मात्रेत घेऊन वेग वेगळे वाटून एका बरणीत भरून ठेवावे. उपाशी पोटी दररोज एक चमचा हे घ्यावे.
 
* जेवणानंतर नियमाने दररोज ताक घ्यावे.
 
* उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी पपीता फायदेशीर ठरतो, म्हणून दररोज त्याचे सेवन करावे.
 
* 5 तुळशीचे पानं आणि 2 कडू लिंबाच्या पानांना वाटून 20 ग्रॅम पाण्यात घालून उपाशी पोटी हे पाणी प्यावे.
 
* गार पाण्याने अंघोळ करण्याऐवजी कोमट पाण्याने अंघोळ करावी,तसेच आहारात जास्त प्रमाणात मीठ व साखरेचा वापर करणे टाळावे.