मंगळवार, 29 नोव्हेंबर 2022
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated: शुक्रवार, 15 जुलै 2022 (18:10 IST)

Health Tips :वजन कमी करण्याचे सोपे उपाय

weight loss
कमी खाऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे व अत्याधिक खाणे दोन्ही आरोग्यासाठी घातक आहे. शरीराला कोणत्याही प्रकारचा अपाय न होता वजन कमी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.बदलत्या जीवनशैलीमुळे आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी मुळे वजन वाढते. बाहेरचे जंक फूड चे सेवन केल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढते आणि वजन वाढते. आपल्याकडे अन्न पदार्थाचे स्वरूप, त्यातील पौष्टिक घटक न बघता फक्त पॅकिंग किंवा कंपनीचे नाव बघून अन्नपदार्थ खाल्ले जातात. या सर्व प्रकारामुळे लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार अशा जीवघेण्या आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे.
वजन कमी करण्यासाठी काही उपाय केले तर वाढत्या वजनाला कमी करता येऊ शकत. चला तर मग वजन कमी करण्याचे उपाय जाणून घेऊ या. 
 
* वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करा
* व्यायामात सतत बदल करा,
 * सतत क्रियाशील राहण्याचा प्रयत्न करा. 
* अनुवंशिकतेने वजन वाढले आहे म्हणून स्वत:ला दोष देऊ नका.
* कुठल्याही प्रकारचे क्रॅश डाएट करू नका. 
 * आहारामध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न करावा.
* किती खातोय यापेक्षा काय खातो आहे याकडे लक्ष द्या.
* आठवड्यातून किमान दोन वेळा फळे, दोन वेळा कोशिंबीर, दोन वेळा कडधान्ये, दोन वेळा फळांचा रस, दोन वेळा पालेभाज्यांचा रस किंवा सूप घेण्याचा प्रयत्न करा. 
* आपली आरोग्य तपासणी नियमित करा.