कारशेड हा अहंकाराचा विषय नाही तर मुंबईकरांच्या प्रवासी सुविधांचा विषय
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल दुपारी पत्रकार परिषद घेऊन शिंदे सरकारला कळकळीची विनंती केली. मुंबई मेट्रोचे कारशेड हे आरे येथे करु नये, कांजूरमार्ग येथेच करावे, असे त्यांनी सांगितले. याविनंतीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. आज त्यांनी पदभार घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, आपल्याला मुंबईकरांचा विचार करावा लागेल. कारशेड हा अहंकाराचा विषय नाही तर मुंबईकरांच्या प्रवासी सुविधांचा विषय आहे.