शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 29 जून 2023 (21:17 IST)

गोवंश रक्षकांकडून मारहाण प्रकरण : ३ पोलीस निलंबित

nashik police
नाशिक : घोटी-सिन्नर मार्गावरील गंभीरवाडीजवळ गोवंश रक्षकांनी एक कार अडवून त्यातील दोघांना केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिस अधीक्षकांनी संबंधित पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांवरही कारवाई केली आहे.
 
घोटी पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक श्रद्धा गंधास यांना नाशिक ग्रामीण नियंत्रण कक्षात नियुक्त करण्यात आले आहे. तर, घोटीतील तीन पोलिस कर्मचाऱ्यांना कर्तव्यात कसूर केल्याने निलंबित केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 
इगतपुरी तालुक्यातील सिन्नर-घोटी मार्गावर असलेल्या गंभीरवाडी भागात गोमांस तस्करीच्या संशयावरून १५-२० जणांनी कार चालकासह (एमएच ०२, बीजे ६५२५) एकाला मारहाण केली. या हल्ल्यात एकाचा मृत्यू, तर दुसरा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी संशयितांवर खून व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. मात्र, या प्रकरणात पोलिसांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका अधीक्षक कार्यालयाने ठेवला आहे. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षकांना नियंत्रण कक्षात नेमण्यात आले आहे. तर, पोलिस कर्मचारी बिपीन जगताप, भास्कर शेळके आणि किसन कचरे यांना निलंबित केल्याची माहिती सूत्रांनी दिली.