शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 26 जून 2023 (20:57 IST)

माझा मी मध्ये छोटासा मार्ग काढत आहे : महादेव जानकर

Mahadev Jankar
भाजप जगातला सर्वात मोठा पक्ष असून त्यांना सल्ला देण्याइतपत मोठा नाही. त्यांच्यावर आम्ही नाराज नाही, राग देखील नाही. आम्ही भाजपसोबत असून आम्हाला विधानसभेला, लोकसभेला जागा मिळाली नाही. आम्ही बंडखोरी करुन शेवटी आमचा आमदार निवडून आणला. त्यामुळे आम्ही एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं डांबरीकरण आहे. दुसऱ्या बाजूला राहुल गांधींचं काँक्रिटीकरण आहे. माझा मी मध्ये छोटासा मार्ग काढत आहे'' असं विधान रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केलं आहे. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते. 
 
यावेळी  जानकर म्हणाले, आम्ही म्हणतो एनडीएत आहे. पण ते जाहीरपणे म्हणत नाही. पण आम्हाला लोकसभेला जागा मिळाली नाही. त्यामुळे आम्ही स्वतःच्या हिंमतीवर पक्ष चालवतो. आम्ही म्हणतो एनडीएत आहे. पण ते जाहीरपणे म्हणत नाही. ज्यावेळी माझे 50 आमदार असतील, त्यावेळी मी बोलेल असं असंही जानकर यावेळी म्हणाले.
 
शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार सांगणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादीने आम्हाला सोबत घेतलं नाही. आम्ही भाजपला म्हणणार नाही, आम्हाला काही द्या. त्यांनी आम्हाला जागा द्याव्या. आम्हाला मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रिपद द्यावं, आमचं हेलिकॉप्टर जर लँड झालं तर, आम्ही आमची जागा दाखवून देऊ असा इशारा देत त्यांना मित्रपक्षाची गरज आहे. मात्र, त्यांनी मित्रपक्षाची वाट लावली असून त्यामुळे आमची स्वतंत्र लढण्याची तयारी सुरु असल्याचा दावाही जानकर यांनी केला आहे.