संबंधित माहिती
- मंगळ ग्रह मंदिराला गुगलतर्फे मिळाले ४.६ रिव्ह्यू असलेले प्रमाणपत्र
- मंगळग्रह सेवा संस्थेतील सेवेकर्यांनी गिरविले निरोगी आरोग्याचे धडे, जागतिक योग दिनानिमित्त निशुल्क योग शिबिर
- मंगल दोष निदानासाठी अमळनेरच्या मंगळग्रह मंदिरातच का जावे?
- श्री.मंगळग्रह मंदिराला अति दुर्मिळ देवगाय दिली भेट
- नाशिकपेक्षा हैदराबादमध्ये कांद्याला भाव जास्त कसा? अजित पवारांचा सवाल
भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष श्री मंगळदेवा चरणी नतमस्तक
अमळनेर:- देशातील अति प्राचीन, अति दुर्मिळ आणि अति जागृत मंदिरांपैकी एक असलेल्या श्री मंगळग्रह मंदिरात भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणेकर यांनी दि.२४ जून रोजी येऊन मंगलदाणींच्या चरणी नतमस्तक होत मनातील इच्छा आकांक्षा देवाकडे व्यक्त केल्या.श्री मंगळग्रह मंदिराविषयी ऐकले होते, त्यापेक्षाही येथील परिसर खूप सुंदर आणि आकर्षक असल्याचे ते म्हणाले. यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव यांनी श्री लोणकर यांना मंदिराविषयीची संपूर्ण माहिती देत संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या सामाजिक,शैक्षणिक,आरोग्य विषयीच्या उपक्रमा बद्दल सांगितले. यावेळी प्रदेश महामंत्री योगेश मेंद,प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, प्रदेश सचिव भैरवी ताई पलांडे, प्रदेश सचिव विजय बनसोडे, प्रदेश सदस्य किरण बोरडे, प्रदेश सदस्य अंकित संचेती, प्रदेश मीडिया संयोजक अमित सोलंके यांची देखील उपस्थिती होती.
पुढील लेख
