रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. मंगळ देव
Written By
Last Modified: शनिवार, 17 जून 2023 (12:21 IST)

श्री.मंगळग्रह मंदिराला अति दुर्मिळ देवगाय दिली भेट

अमळनेर-: अति दुर्मिळ असलेली देवगाय एका भाविकाने श्री.मंगळग्रह मंदिरास दिनांक १७ जून रोजी भेट स्वरूपात दिली. या गाईचे दर्शन येथे येणाऱ्या हजारो भाविकांना घेता येणार आहे.अमळनेर तालुक्यातील लाडगाव येथे वास्तव्यास असलेले विश्वास सजर भिल यांनी श्रद्धेपोटी एस.एन.पाटील यांच्या प्रेरणेतून अति दुर्मिळ देवगाय मंदिराला भेट स्वरूपात दिली. या गाईचे वैशिष्ट्य म्हणजे, गाईच्या मानेवर पिंड आहे. हिंदू धर्मात या गाईला अतिशय महत्त्व आहे.

गाईला चारा खाऊ घातल्यास पुण्य मिळत असल्याची श्रद्धा भाविकांमध्ये आहे. श्री.मंगळग्रह मंदिरात येणाऱ्या भाविकांना गायीच्या दर्शनाचा लाभ देखील होणार आहे. विश्वास भील यांनी अनेक वर्षांपासून या गाईची देखभाल केली. मात्र या गाईचे दर्शन भाविकांना देखील व्हावे या हेतूने त्यांनी ही गाय मंदिरास भेट स्वरूपात दिली. यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस.एन.पाटील, विश्वस्त अनिल अहिराव यांची उपस्थिती होती.