रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. मंगळ देव
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 मे 2023 (15:26 IST)

जळगाव येथील भाविकाचा श्री मंगळग्रह मंदिरास सिमेंटचा बाकडा भेट

mangal dev mandir amalner
अमळनेर:- जळगाव येथील भाविकास पुत्र प्राप्ती झाल्याने त्यांनी श्री मंगळग्रह मंदिरास भाविकांना बसण्यासाठी सिमेंटचा बाकडा भेट स्वरूपात दिला. श्री मंगळग्रह मंदिर हे अति प्राचीन, अति दुर्मिळ आणि अति जागृत देवस्थानांपैकी एक आहे. या ठिकाणी दररोज हजारो भाविक दर्शन व अभिषेकासाठी येत असतात. यामुळे मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. मंदिर परिसरात भाविकांना कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी येथील विश्वस्त नेहमी तत्पर असतात.
mandir amalner bench

या ठिकाणी भाविकांना बसण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. या मंदिरात भाविक मनात इच्छा, आकांक्षा घेऊन येत असतात. त्यांची पूर्ती झाल्यास भाविक पुन्हा दर्शनासाठी येत असतात. जळगाव येथील भाविक दीपक महाजन यांनी देखील श्री मंगळग्रह मंदिरास नुकताच सिमेंटचा बाकडा भेट म्हणून दिला.