1. धर्म
  2. हिंदू
  3. मंगळ देव
Written By

मंगळदेवाच्या मंदिरात मंगळ टिका लावून केलं जातं स्वागत

महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील धुळ्याजवळील अमळनेर तालुक्यात मंगळाचे एक प्राचीन आणि जागृत मंदिर आहे, जिथे दर मंगळवारी हजारो भाविक येतात. येथे येणाऱ्या भाविकांसाठी अनेक मोफत सुविधा आहेत. दर्शनासाठी व्हीआयपी व्यवस्था नाही.
 
मंदिरात विनामूल्य पार्किंग स्टँड आहे, तर पादत्राणे स्टँड देखील विनामूल्य आहे. येथे अनेक ठिकाणी भाविकांसाठी फिल्टर केलेल्या शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या शुद्ध पाण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. विशेष म्हणजे दर मंगळवारी येथे मोफत आरोग्य शिबिरही आयोजित केले जाते.
 
याशिवाय अनेक मंदिर परिसरात, मंदिराच्या बाहेर किंवा आतमध्ये तुम्हाला लोक हातात ताट घेऊन टिळक लावताना दिसतील, ज्यामध्ये तुम्हाला दक्षिणा द्यावी लागते, परंतु मंगळ ग्रह मंदिरात ही परंपरा स्वागतपरंपरेत बदलली आहे. 
अनेक मंदिर परिसरात कपाळावर टिळक लावणारे तुमच्याकडून 5 किंवा 10 रुपये घेतात किंवा तुम्ही त्यांच्या ताटात स्वेच्छेने काही पैसे दान करतात, परंतु मंगळ ग्रह मंदिरात प्रत्येक भक्ताला मंगळ टिळक लावला जातो. यासाठी कोणतेही शुल्क आकराले जात नाही, त्यासाठी आग्रह केला जात नाही किंवा मुळीच घेतले जात नाही असे म्हणावे. भाविकांच्या इच्छेनुसार त्यांना टिळक लावण्यात येतं आणि यासाठी कोणी स्वत:हून पैसे दिले तरी आम्ही घेत नाही, असे मंदिर सेवकांचे म्हणणे आहे.