श्री मंगळ ग्रह मंदिरात दर्शन रांगेत भाविकांसाठी बैठक व्यवस्था
अमळनेर - अतिप्राचीन असलेल्या अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठया प्रमाणात गर्दी असते. भाविकांना कमी वेळेत दर्शन व्हावे व रांगेत गैरसोय होऊ नये, यासाठी आता दर्शन रांगेत बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
मंगळ ग्रह मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या जेष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तीची गैरसोय होऊ नये, यासाठी मंदिरात व्हीलचेअर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लांबपल्याहून येणाऱ्या भाविकांना कमी वेळेत दर्शन घेता यावे, यासाठी महिला व पुरुषांची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे.
मंगळग्रह देवता रेती, माती, शेती व मांगलिक असलेले भाविकांचे श्रद्धांस्थान असल्याने मंगळवारी अभिषेक, होमहवन करण्यासाठी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने दाखल होतात. दर्शन रांगेत जास्त वेळ उभे राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी मंदिर प्रशासनाकडून आता दर्शन रांगेच्या दोन्ही बाजूला बैठक व्यवस्था केली आहे.