रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. मंगळ देव
Written By

मांगलिक आहात ? तर मंगळग्रह मंदिरात स्वतंत्र अभिषेक करवण्याचा उपाय योग्य ठरेल

महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे असलेल्या मंगळाच्या प्राचीन मंदिरात दर मंगळवारी भोमयज्ञ अभिषेक, पंचामृत अभिषेक, नित्य प्रभाव श्री मंगळ अभिषेक, स्वतंत्र अभिषेक, सामूहिक अभिषेक आणि हवनात्मक अभिषेक केला जातो. 
 
जर तुमच्या कुंडलीत मांगलिक दोष असेल, वैवाहिक कार्यात काही अडथळे येत असतील किंवा वैवाहिक जीवन सुखाने व्यतीत होत नसेल तर मंगळाच्या मंदिरात स्वतंत्र अभिषेक करून तुम्ही या समस्येपासून मुक्ती मिळवू शकता.
 
सामुहिक अभिषेकमध्ये तुम्हाला मंदिर संस्थेकडूनच अभिषेक व पूजा थाळी व साहित्य दिले जाते. अभिषेकानंतर मंगळ यंत्र, प्रसाद, मंगळ चालीसा, मंगळ देवाचे चित्र तुमच्यासमोर सादर केले जातात.
 
स्वतंत्र अभिषेकमध्ये अविवाहित असल्यास ती व्यक्ती एकटी बसून आणि विवाहित असेल तर पती-पत्नी दोघे मिळून हा अभिषेक करू शकतात. हा अभिषेक सामूहिक अभिषेकापेक्षा जरा अधिक वेळ सुरु असतो. म्हणजेच हा अभिषेक करण्यासाठी सुमारे दीड तास लागतो. असे मानले जाते की या अभिषेकाने मंगळ दोष लगेच दूर होतो आणि व्यक्ती आनंदी जीवन जगते.
 
येथे विद्वान पंडित हा अभिषेक करतात. पंडित आणि विद्वानांच्या पथकाचे नेतृत्व पंडित प्रसाद भंडारी गुरुजी करत असून मुख्य पुजारी केशव पुराणिक आहेत. दोघांच्या उपस्थितीत पंडितांद्वारे पूजा व अभिषेक करण्यात येतो.
 
जर तुम्हाला हा अभिषेक करायचा असेल तर तुम्हाला काउंटरवरून पावती कापून घ्यावी लागेल किंवा तुम्ही ऑनलाइन बुकिंगही करू शकता कारण शेकडो लोक अभिषेकसाठी येतात आणि वेटिंग रुममध्ये थांबतात.
 
जर भाविकांना मंगळ ग्रह मंदिरात अभिषेक आणि दर्शनासाठी यायचे असेल, तर अभिषेकचे बुकिंग करणे आणि घरबसल्या ऑनलाइन पैसे भरणे आता सोपे झाले आहे. ऑनलाइन बुकिंगसाठी www.mangalgrahamandir.com संकेत स्थळाला भेट दिल्यानंतर भाविकांना अभिषेक बुकिंग फॉर्म दिसेल. हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला लगेच पावतीही मिळेल. या पावतीचा स्क्रीन शॉट तुमच्याकडे जतन करा. पावती मोबाईलमध्ये सेव्ह करून दाखवली तर मंदिरातील बुकिंग काउंटरवर लगेच अभिषेक स्वीकारला जाईल.