सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. मंगळ देव
Written By

श्री मंगळग्रह मंदिरावर भाविकांचे सलग तेरा तास श्रमदान

*जय बाबाजी ग्रुपचा अभिनव उपक्रम 
*भारत भरात 500 ठिकाणी राबविली सेवा  

भारत अभियानांतर्गत शिवराज्याभिषेक व जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दि. 4 जून रोजी जय बाबाजी ग्रुपच्या सदस्यांनी श्री. मंगळग्रह मंदिर येथे पहाटे पाच ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत श्रमदान करून अनोखा उपक्रम राबविला.
 
जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज, तसेच महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली 10 लाख तासाचे स्वच्छतारूपी महाश्रमदानाचा उपक्रम संपूर्ण भारतभर राबविला जात आहे. भारतातील ऐतिहासिक व धार्मिक अशा 500 स्थळांवर 1 लाख भाविकांच्या सहभागाने हे श्रमदान राबविले जात आहे. याचाच भाग म्हणून नागडे.ता.येवला. जिल्हा नाशिक येथील जय बाबाजी ग्रुपच्या सदस्यांनी श्री.मंगळग्रह मंदिरावर रविवारी पहाटे पाच वाजेपासून विधिपठण व आरती झाल्यानंतर श्रमदानाला सुरुवात केली. 
 
135 जणांचा या उपक्रमात सहभाग होता. बाळू शिंदे, एकनाथ सातारकर, रमेश सोमासे, ज्ञानेश्वर भावसार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रुपच्या सदस्यांनी श्रमदान केले. तत्पूर्वी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी,विश्वस्त अनिल अहिरराव यांनी जय बाबाजी ग्रुपच्या सदस्यांना श्री.मंगळग्रह मंदिराविषयी संपूर्ण माहिती देऊन मंदिराच्या सामाजिक उपक्रमाविषयी देखील जाणीव करून दिली.