शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. मंगळ देव
Written By
Last Modified: मंगळवार, 4 एप्रिल 2023 (19:59 IST)

श्री मंगळग्रह मंदिरात गुरुवारी हनुमान जन्मोत्सव

अमळनेर :येथील श्री मंगळग्रह मंदिरात गुरुवार, ६ एप्रिल रोजी श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंगळग्रह सेवा संस्थेच्यावतीने हनुमान जन्मोत्सवाची तयारी करण्यात आली आहे. या महापुजेचे मानकरी शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले  (पुणे) आहेत. पहाटे ५ ते  सकाळी ८ वाजेपर्यंत जन्मोत्सव सोहळा होईल. त्यानंतर सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना तीर्थप्रसाद वाटप होणार आहे. त्यासाठी उपस्थितीचे  आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेने केले आहे.