शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. मंगळ देव
Written By
Last Modified: बुधवार, 29 मार्च 2023 (23:41 IST)

चैत्र नवरात्रीनिमित्त मंगळग्रह मंदिरात देवीच्या साडेतीन शक्तीपीठाची आरास

aaras
नवचंडी महायागाच्या पूजेचे आयोजन
अमळनेर:- चैत्र नवरात्रीनिमित्त मंगळग्रह मंदिरात नवचंडी महायागानिमित्त महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांची व विश्वातील एकमेव असलेल्या भूमी मातेच्या प्रतिमेची आकर्षक आरास तयार करण्यात आली आहे.                                                   
बुधवार दि.२९ मार्च रोजी होणाऱ्या नवचंडी महायागाच्या पूजेसाठी सकाळी ९ ते १२ या वेळेत श्री गणपती पुण्यवाचन, मातृकापूजन, नांदी श्राद्ध, आचार्य पूजन, वास्तुपूजन, योगिनी पूजन, सर्वतोभद्र मंडल पूजन, क्षेत्रपाल पूजन, चतुषश्ट भैरव पूजन, नवग्रह पूजन, ईशान्य रुद्रकलश पूजन करण्यात येणार आहे. दुपारी १ ते ५ या वेळेत दुर्गा सप्तशती पाठांचे हवन, स्थापित देवतांचे हवन, बलिदान, पूर्णाहुती  करण्यात येणार आहे. यानंतर सायंकाळी ६ वाजेला महाआरती होणार आहे. नवचंडी महायाग पूजेसाठी मानकरी म्हणून संजय पवार(अध्यक्ष,जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि), हिरालाल पाटील (भाजप तालुकाध्यक्ष अमळनेर), विक्रांत पाटील (माजी नगरसेवक अमळनेर), शिरीष डहाळे (ज्ञानवर्धिनी क्लासेसचे संचालक), जय निकम (जळगाव), आर.पी.नवसारीकर (अमळनेर), एम.बी.चव्हाण (अमळनेर), प्रवीण सपकाळे (अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ), संजय विसपुते ( अमळनेर) यांची उपस्थिती राहणार आहे. पूजा व तीर्थप्रसादासाठी भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे करण्यात आले आहे.