रविवार, 13 ऑक्टोबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. मंगळ देव
Written By
Last Modified: सोमवार, 27 मार्च 2023 (17:29 IST)

नंदुरबारच्या उपजिल्हाधिकारी कल्पना ठुबे यांची मंगळग्रह मंदिराला भेट

kalpana thube
अमळनेर: नंदुरबार येथील उपजिल्हाधिकारी कल्पना ठुबे व स्टेट टॅक्स ऑफिसर रमेश ठुबे यांनी रविवार, २६ मार्च रोजी येथील मंगळग्रह मंदिराला सदिच्छा भेट दिली.  अमळनेरचे मंगळग्रह मंदिर हे अतिप्राचीन, अतिदुर्मिळ व अतिजागृत मंदिरांपैकी एक आहे. यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शन व अभिषेकासाठी येत असतात. नंदुरबार येथील उपजिल्हाधिकारी कल्पना ठुबे यांनी कुटुंबियांसह मंगळग्रह मंदिराला भेट देऊन मंदिराची संपूर्ण माहिती जाणून घेतली. यावेळी अमळनेर येथील प्रांताधिकारी सीमा अहिरे यांची उपस्थिती होती. मंगळग्रह सेवा संस्थेचे सचिव सुरेश बाविस्कर यांनी मंदिराबद्दलची संपूर्ण माहिती देऊन संस्थेतर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची संबंधितांना माहिती दिली. मंदिर परिसर अत्यंत सुंदर असून, मन प्रसन्न करणारा असल्याचे यावेळी कल्पना ठुबे यांनी सांगितले.