मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. मंगळ देव
Written By
Last Modified: सोमवार, 20 मार्च 2023 (09:08 IST)

भडगाव ते अमळनेर सायकलस्वारी करीत दोन सायकलपटूंनी घेतले मंगळग्रह देवतेचे दर्शन

अमळनेर : भडगाव येथून अमळनेर येथे सायकलस्वारी करीत दोन सायकलपटूंनी मंगळग्रह देवतेचे दर्शन घेऊन तरुणाईला आरोग्य सुदृढ राखण्याचे आवाहन केले.                                                                                   भडगाव येथील रहिवासी विकास सोनवणे व कोमल ठाकरे यांनी रविवार, १९ मार्च रोजी सकाळी सायकलस्वारी करीत मंगळग्रह देवतेचे दर्शन घेतले. सकाळी ७.१५ वाजता त्यांनी प्रवासाला सुरूवात केली होती. १०.१५ वाजता मंदिरात पोहोचले. मंगळग्रह देवतेचे दर्शन घेतल्यानंतर त्यांच्याशी सेवेक-यांनी चर्चा केली. याप्रसंगी ते म्हणाले, की भडगाव, पाचोरा, जळगाव, पद्मालय देवस्थान, पाटणादेवी मंदिर आदी ठिकाणी सायकलवरून यापूर्वी प्रवास केला आहे. आरोग्य चांगले राहावे, ताणतणाव दूर व्हावा तसेच निसर्ग सान्निध्य प्रत्यक्ष अनुभवावे, या उद्देशाने नेहमी सायकलवरून प्रवास करीत असतो. सायकल चालविल्याने शरीराला ऊर्जा मिळत असते. आज तरुणाईला भविष्याच्या दृष्टीने आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. जर तरुण पिढी विविध व्याधींपासून दूर राहिली, तर सक्षम भारत घडविणे सहज शक्य होईल. अमळनेर येथून त्यांनी पुन्हा भडगावकडे प्रस्थान केले.